आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेच्या पूर्वसभ्येला मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह येत मनसेत खळबळ उडवून दिली आहे.
निलेश मोरे आणि वसंत मोरे आपल्या 20 समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा अफवा पसरवल्या गेल्या, असं मोरे म्हणाले. ही बातमी आम्हांला स्वत:ला धक्का देणारी होती. पुणे मनसेत झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्यायला हवा. हा माझ्यापेक्षा जास्त धक्का निलेश माझिरे यांना बसला आहे. मनसेतील पार्ट टाईम कार्यकर्त्यांनी मनसेत फूट पाडण्याचे काम केलं आहे.
हे ही वाचा : ‘…पण राज ठाकरेंच्या पुण्याच्या मेळाव्यात वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?’; शिवसेनेचा सवाल
आज गेल्या 2-3 दिवसांपासून ज्या काही घडामोडी पुणे शहरात चालू आहेत त्यात निलेश माझिरे यांना पक्षामध्ये आणत असताना मी निलेश माझिरेंचा प्रवेश करून घेतला आणि राज साहेब ठाकरेंच्या हस्ते प्रवेश करून घेतला. त्यानंतर निलेश माझिरेंनी काय काम केलं, ते संपूर्ण पुणे शहराला माहिती आहे. निलेश माझिरे एक शहर अध्यक्ष असून त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर गदारोळ झाला. कुणी या अफवा पसरवल्या हे मला माहीत नाही. पण खोट्या बातम्या पसरुन निलेश माझिरेंना डावलण्यात आल्याचा मोरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेची मोठी खेळी; राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेचे तब्बल ‘इतके’ पदाधिकारी हाती बांधणार शिवबंधन”
“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”
“शिवसेनेचा जोरदार पलटवार; मनसेचा ‘हा’ मोठा नेता समर्थकांसह हाती बांधणार शिवबंधन”