आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला.
न्यायालयाकडून मिळालेल्या या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ येथे भेट घेतली.
हे ही वाचा : “किरीट सोमय्याला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत?, ब्लॅकमेलर जेल जायेंगे”
शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
दरम्यान, या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर काल या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दाैरा स्थगित?”
पावसाचे कारण देऊन मैदान सोडलं, आणि…; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”