मुंबई : औरंगाबादमध्ये मालगाडीखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दूर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या मजुरांना मनसेने श्रद्धांजली अर्पण केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
जनजीवन कधी रुळावर येईल? या प्रश्नाचं असं उत्तर मिळेल हे वाटलं नव्हतं… संभाजीनगरचं मृत्यूतांडव सुन्न करणारं… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत मनसेनं श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे 19 मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे 16 जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
…सुन्न करणारं मृत्यूतांडव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.#मृत्यूतांडव #संभाजीनगर #मजूर #TrainAccident pic.twitter.com/Fb1Ltnvhzk
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
एकनाथ खडसे आणि पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल- चंद्रकांत पाटील
विधान परिषद उमेदवारांच्या निवडीवर खडसेंनी सोडलं मौन; म्हणाले…
मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय त्यांना काही फरक पडणार नाही- निलेश राणे
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत; उद्धव ठाकरेंची घोषणा