Home महाराष्ट्र भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला- अहमद पटेल

भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला- अहमद पटेल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यावर काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी मत व्यक्त केलं आहे.

रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करून सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामागे काळेबेरे आहे, हे निश्चित आहे, असं अहमद पटेल यांनी म्हटलं आहे.

भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून संविधानाची पायमल्ली केली आहे. आजचा दिवस इतिहासात काळ्या अक्षरात लिहीला जाईल, असंही अहमद पटेल म्हणाले.

रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करून सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामागे काळेबेरे आहे, हे निश्चित आहे. भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून संविधानाची पायमल्ली केली आहे. आजचा दिवस इतिहासात काळ्या अक्षरात लिहीला जाईल: मा. अहमद पटेल pic.twitter.com/RiiP5WsxPE

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2019

दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अजित पवार त्यांच्या निर्णयावर फेरविचार करतील, असं म्हटलं आहे.