आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बेळगावमधील कित्तूरमध्ये चेन्नाम्मा यांच्या पुतळ्याचं अनावरण बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदपवारांच्या हस्ते करण्यात आलं. शरद पवारांच्या बेळगाव दौऱ्यानंतर भाजपचे माजी खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत
भाजपचे माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी शरद पवारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. प्रभाकर कोरे हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. प्रभाकर कोरे हे राज्यसभेचे खासदार देखील होते. मात्र, कोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे प्रभाकर कोरे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रभाकर कोरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजप आमदार अभय पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे सदर कार्यक्रम हा लिंगायत समाजाचा होता. तो कार्यक्रम भाजपचा नव्हता. प्रभाकर कोरे आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत, असं अभय पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- संजय राऊत
“मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन”
राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा