आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
बाळा नांदगावकर यांनी याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यासंबंधी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
हे ही वाचा : मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे- नाना पटोले
पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंचा राजकीय गेम होईल, तेंव्हा त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही”
मुंबई पोलिसांच्या नोटीसीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“राज ठाकरेंना कोण कशाला इजा करेल, त्यांना भिती वाटत असेल तर संरक्षण दिलं पाहिजे”