Home महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या नोटीसीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई पोलिसांच्या नोटीसीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली. यावरून गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

माझ्या चौकशीचा हेतू माझ्या वकिलांनी स्पष्ट केला. याला सत्तेचा दुरुपयोग म्हणतात. कायद्याच्या गैरवापराला आम्ही घाबरत नाही. कष्टकरी जनसंघाने बँकेच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्यावर पायाखालची वाळू निसटली आहे का? कायदेशीर बाबींना यापुढे ‘डंके की चोटपर’ उत्तरं देऊ. आमचं स्वातंत्र्य, संवैधानिक हक्कांना तुम्ही अशाप्रकारे पायदळी तुडवू शकत नाही, असं सदावर्ते म्हणाले.

हे ही वाचा :“राज ठाकरेंना कोण कशाला इजा करेल, त्यांना भिती वाटत असेल तर संरक्षण दिलं पाहिजे”

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना पाठवण्यात आलेली नोटीस राजकीय हेतूने पाठवण्यात आलीये. या नोटीस सीआरपीसी कलम 110 नुसार पाठवण्यात आली आहे. ही कलमं समाजात ज्या लोकांना मोकळं सोडणं धोकादायक आहे त्यांना लावण्यात येते. खरंतर हा ट्रायल कोर्टाचा अवमान आहे. आमच्याविरोधात दाखल गुन्हा खोटा आहे. पोलिसांकडे याबाबत कोणताही पुरावा नाही., असं सदावर्तेंच्या वकिलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी”

भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

तुरूंगात दणके बसले नाहीत, याबद्दल सरकारचे आभार माना; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला