Home पुणे “तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, आणि आता ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं”

“तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, आणि आता ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार देशात निर्माण व्हावा आणि त्याने देशातील एकाधिकारशाही, मनमानी याविरोधात आसूड ओढावा अशी आम्ही देवाकडे नेहमी प्रार्थना करतो. ज्यांच्यात ही क्षमता आहे असं आम्हाला वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

हे ही वाचा : हनुमान चालिसावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गेल्या 24 तासांत लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केली आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह असंख्य तीर्थस्थानी काल आणि आज काकडआरती होऊ शकली नाही त्यामुळे असंख्य भाविक नाराज झाले. तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं आणि ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भोंग्याच्या निर्णयावरून शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले…

“मोठी बातमी! अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल”

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी…; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका