आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे. मात्र याधीच राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या महाराष्टात सुडाचं राजकारण सुरू असून हे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राला आणि देशाच्या हितासाठी हे परवडणारे नाही, इतकंच मी सांगेन, असा टोला संजय राऊतांनी यावेळी राज यांनी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!
हिंदुह्रदयसम्राट एकच आहेत. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच लोकांना माहिती आहे. कुणी कितीही भगव्या शाली पांघरल्या, शिवसेना प्रमुखांच्या कितीही नकला केल्या, तरीही शिवसेना प्रमुख हिंदुह्रदयसम्राट एकच आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा अप्रत्यक्ष टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे, सभेला घातलेल्या अटी पाळणार का?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…