आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यासंदर्भातील वृत्त टीव्ही 9 नं दिलं आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांनी प्रत्यक्ष बैठक वा भेट घेतल्याचे प्रसंग अगदीच दुरापास्त झालेले असताना आज अचानक ही भेट घेण्याचं कारण काय ठरलं? यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
हे ही वाचा : मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर; प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यत प्रथम
दरम्यान, राज ठाकरेंनी पाडवा मेळावा आणि नंतर ठाण्यातील उत्तर सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून मांडलेली भूमिका वादासाठी कारणीभूत ठरू लागली आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत होता. अशातच आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे, सभेला घातलेल्या अटी पाळणार का?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
“कोणी योगी आहे, तर कोणी…; जितेंद्र आव्हाडांची टीका नेमकी कोणावर?; राज ठाकरेंवर की अमृता फडणवीसांवर?”