Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर; प्रमोद चौगुले,...

मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची गुणवत्ता यादी जाहीर; प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यत प्रथम

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला. त्यात प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

हे ही वाचा : काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला झालेली अटक बेकायदेशीर; महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील यांचा भाजपवर आरोप

आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 15 संवर्गातील 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल 2020 मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली. अखेर मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी 2 लाख 62 हजार 891 उमेदवारांनी नोंदणी केली, तर 1 लाख 71 हजार 116 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

दरम्यान, पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आला. 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 863 उमेदवारांनी डिसेंबर 2021 मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या 615 उमेदवारांपैकी 597 उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे, सभेला घातलेल्या अटी पाळणार का?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“कोणी योगी आहे, तर कोणी…; जितेंद्र आव्हाडांची टीका नेमकी कोणावर?; राज ठाकरेंवर की अमृता फडणवीसांवर?”

सत्तेसाठी यू – टर्न; भोंग्याच्या निर्णयावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला