आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी आज सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र दिनी राज यांची ही सभा होणार असून यासाठी 16 अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परवानगी मिळाल्यानंतर पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“येणाऱ्या लोकांना तुम्ही थांबवू शकत नाही. जेवढे लोक येतील, तेवढ्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं त्याबाबत पोलिसांशी सहकार्याने आम्ही काम करू. उद्या दुपारी यासंदर्भात पोलिसांसोबत आमची बैठक आहे, असं नांदगावकर म्हणाले. तसेच पोलिसांनी घातलेल्या अटींचं पालन केलं जाईल, असंही नांदगावकर यांनी यावेळी म्हटलं.
आयुक्तांनी जी परवानगी दिली आहे, त्याबद्दल आम्हांला सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे. पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की, त्यांनी घातलेल्या अटींचं नक्कीच पालन केलं जाईल. कायदा-सुव्यवस्था राखणं तुमच्याप्रमाणेच आमचं देखील कर्तव्य आहे. ते नक्कीच पाळलं जाईल, असं आश्वासन नांदगावकरांनी यावेळी दिलं.
हे ही वाचा : सत्तेसाठी यू – टर्न; भोंग्याच्या निर्णयावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
दरम्यान, औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी 16 अटी घालण्यात आल्या असून त्यात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता बाळगावी, कोणताही धर्म, प्रांत, वंश आणि जात यावरून आक्षेपार्ह विधान करू नये, सभेच्या आधी मिरवणूक काढू नये, अशा काही प्रमुख अटींचा समावेश आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सत्तेसाठी यू – टर्न; भोंग्याच्या निर्णयावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
उद्या ठाकरे सरकार विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार- किरीट सोमय्या