आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता सोमय्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक याच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
उद्या दुपारी 1 वाजता आम्ही मुंबई हायकोर्टात ठाकरे सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 18 कोटीचा दंड माफी आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात याचिका दाखल करणार आहोत, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
हे ही वाचा : निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला होता; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
दरम्यान, या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
उद्या दुपारी 1 वाजता आम्ही मुंबई हायकोर्टात ठाकरे सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ₹१८ कोटीचा दंड माफी आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात याचिका दाखल करणार आहोत.@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 28, 2022
महत्वाच्या घडामोडी –
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं विधान
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी; मनसेने दिली प्रतिक्रिया
भोंग्याच्या वादात आता अमृता फडणवीसांची उडी; ठाकरे सरकारवर साधला निशाणा; म्हणाल्या…