आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज यांच्या या घोषणनंतर उत्तर प्रदेश सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशच्या या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे खुश आहेत. गुढीपाडवा मेळाव्यातूनही राज ठाकरेंनी योगी सरकारचं कौतुक केलं होतं. आता मशिदींवरील भोंगे हटविल्यानंतर, योगी सरकारवर राज ठाकरे हे खूप खूश झाले आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यात राज ठाकरे योगींची भेट घेण्याची बातमी समोर येत आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत योगी सरकारचं अभिनंदन केलं आहे.
हे ही वाचा : शिवसेना-भाजप युतीसंदर्भात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…
“उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोंगी महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“हिंदूजननायक असा उल्लेख करत औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात जोरदार बॅनरबाजी; सभा होणार म्हणजे होणार?”
आपापसातील बंधुभाव कमी करण्याचं वक्तव्य करणं योग्य नाही; शरद पवारांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
“भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी माझे हात कलम करून घ्यायलाही तयार “