Home महत्वाच्या बातम्या “भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी माझे हात कलम करून घ्यायलाही तयार...

“भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी माझे हात कलम करून घ्यायलाही तयार “

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भ्रष्टाचार झाला असेल, तर वंचित आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या समोर मी हात कलम करायलाही तयार आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी

“अकोल्याच्या न्यायालयाने माझ्यावर 420 गुन्हा दाखल करून चौकशी करा असं म्हटलंय. मला संभ्रम आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशा प्रकारे जर चौकशी न करता असे आदेश दिले जात असतील तर फार चुकीचा संदेश नागरिकांसमोर जाईल. सध्या फार भीतीचं वातावरण आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करून बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका; हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं घड्याळ”

स्वत:वर हल्ला झाला म्हणून, काही लोक ओठाखाली साॅस लावून फिरतात आणि…; संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

तब्बल 18 दिवसांच्या कोठडीनंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका, बाहेर येताच म्हणाले…