Home पुणे ‘….म्हणून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो’; राजू शेट्टींचा खुलासा

‘….म्हणून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो’; राजू शेट्टींचा खुलासा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : शेतकऱ्यांसंबंधी अन्यायकारक निर्णयावर 11 फेब्रुवारीला शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मी पत्र लिहिलं होतं. या निर्णयावर ‘महाविकास आघाडी सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून महाविकास आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर पडलो,’ असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

‘महाविकास आघाडीने भूमीग्रहण कायद्यात मोडतोड केली असून, शेतकऱ्यांना याचे उत्तर द्यावे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ऊस हे एकमेव हमीभाव मिळणारे पीक आहे. असाच कायदा इतर पिकांबाबत असता, तर शेतकरी त्या पिकांकडेही वळले असते, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. ‘स्वाभिमानी’च्या हुंकार यात्रेनिमित्त बारामती येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर केली बॅनरबाजी

दरम्यान खासदार शरद पवार दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री होते. त्यांनी हा निर्णय घेतला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र ते जाणीवपूर्वक ऊस आळशी माणसाचे पीक असल्याचे बोलत आहेत. ऊस उत्पादकांमुळेच त्यांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले, याचा त्यांना विसर पडला आहे, असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; एमआयएम, भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

रेणु शर्माला अटक झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…