Home महाराष्ट्र मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर केली बॅनरबाजी

मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर केली बॅनरबाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर ठीकठिकाणी ‘चला अयोध्येला’ अशी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दादरमधील शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर मनसेने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची माहिती देणारा बॅनर लावला आहे, त्यामुळे मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा : …म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

दरम्यान, या बॅनरवर राज ठाकरे यांचा भगवाधारी फोटो असून ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगावाधारी’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. चला अयोध्येला, आम्ही चाललोय तुम्हीही चला’, असं आवाहनही मनसेकडून कारण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; एमआयएम, भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

रेणु शर्माला अटक झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राष्ट्रवादी पक्षाचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती बांधलं घड्याळ”