आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : बीडमधून थेट धनंजय मुंडे यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना कोल्हापूरमध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत करुणा शर्मा यांचं डिपॉझिट जप्त झालं असून त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा अवघा शंभरीपार पोहोचला आहे.
करुणा शर्मा यांनी मात्र माध्यमांशी बोलताना बीडमध्ये विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कोल्हापुरातील आगामी नगरपालिका निवडणुका लढवण्याचं बळ आपल्याला मिळाल्याचं म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना मात्र अवघी १३३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचं डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे.
दरम्यान, झी २४ तासशी बोलताना करुणा शर्मा यांनी आयोगाकडे तक्रार केल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
उत्तर कोल्हापूरच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय
“कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सूरूवात, तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर”