आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. नंतर ठाण्यातल्या उत्तर सभेत त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. यावरून आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. ते नवी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : उत्तर कोल्हापूरच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“माझं म्हणणं असं आहे की वाद निर्माण करणारी वक्तव्य कुणी करू नये. संविधानाच्या विरोधात कुणी भूमिका घेऊ नये. प्रत्येकाला घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे. कुणाचं तोंड आपण बंद करू शकत नाही. पण बोलत असताना आपण काय बोलतोय, याचं भान ठेवलं पाहिजे. परंपरागत पद्धतीने मशिदींवर भोंगे आहेत. मशिदीवर आहेत भोंगे म्हणून बाकीच्यांनी करू नयेत सोंगे. म्हणजे त्यांनी असं उलट-सुलट बोलून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, याआधी देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून विरोध केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय
“कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सूरूवात, तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर”
“कायम राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारा मी माणूस, पण पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो”