आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यात झालेल्या उत्तरसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. त्यानंतर भाजपचे काही नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटून गेले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप-मनसे युती होणार का? अशी चर्चा सूरु झाली. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे त्यांच्या भूमिकेच्या आधारावर आपली जागा निर्माण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता पवार यांनी, ते मला सांगता येणार नाही., असं म्हणाले. तसेच आत्तापर्यंत तर काही झालं नाही. पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये, असंही शरद पवार म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : “पुणे दाैऱ्याआधीच राज ठाकरे झाले हिंदुजननायक; हनुमान जयंतीला वातावरण तापणार?”
तुम्ही काहीही भूमिका घेतली तरी आमची भूमिका महत्त्वाची नाही. आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज ठाकरेंबद्दल लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
भोंग्यावरून महागाईबद्दल बोला म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मनसेला भाजपसोबत घेणार का?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी; मनसेची आक्रमक मागणी