आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुन सध्या शिवसेना (Shivsena) आणि मनसेत (MNS) शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली आसता या विषयावर मला फार टिप्पणी करायची नाही. पण मनसेने भोंगे लावल्यास त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : मनसेला भाजपसोबत घेणार का?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?#विरप्पान_गॅंग, असं ट्विट करत देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?#विरप्पान_गॅंग
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 15, 2022
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी; मनसेची आक्रमक मागणी
“उद्या ठाकरे सरकारमधील आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच; रिचेबल झाल्यानंतर सोमय्या उद्या बाॅम्ब फोडणार?”
“मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून ‘या’ नाराज नेत्याने दिला राजीनामा”