आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधलाय.
फडणवीस यांनी 2012 मध्ये राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली यावरुनही बातमीची लिंक पोस्ट करत आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं; म्हणाले…
“कश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?,” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना विचारला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस, आपण आज बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे जे सोंग केले ते वरवरून आहे का? एकीकडे संविधान व जय भीम म्हणायचे आणि आतून मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्याचे षडयंत्र रचायचे? हेच आयुष्यभर करणार आहात का?,” असे प्रश्न या टीकेवरुन मिटकरींनी फडणवीस यांना विचारले आहेत.
श्री देवेंद्र फडणवीस जी आपण आज बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे जे सोंग केले ते वरवरून आहे का? एकीकडे संविधान व जयभिम म्हणायचे आणि आतुन मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्याचे षडयंत्र रचायचे ? हेच आयुष्यभर करणार आहात का.?
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 14, 2022
महत्वाच्या घडामोडी –
जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने
राज ठाकरे सातत्यानं आपली भूमिका बदलतात, त्यामुळे…; राज यांच्याविरोधात शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी”
सुळे घुसले की, किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा; राष्ट्रवादीचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर