आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची परवा दिवशी ठाणे येथे भव्य सभा भरवण्यात आली. या सभेत जोरदार टोलेबाजी करत राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज यांना प्रत्युत्तर देण्यास सूरूवात केली. अशातच आता मुंबईत राज यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.
राज ठाकरे सातत्याने आपली भूमिका बदलतात आणि कधीही आपल्या भूमिकेवर ठाम नसतात, असा मजकूर या बॅनरमध्ये लिहिला आहे. पोस्टरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकामी ठेवून, राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल? याबाबत प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
हे ही वाचा : “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”
दरम्यान, या पोस्टरमधील पहिला फोटो जुना असून यात राज ठाकरे मुस्लीम वेशभूषेत पहायला मिळतात. ‘काल’ असं या फोटोच्या वरती लिहिलेलं आहे. दुसऱ्या फोटोवर आज असं लिहित हनुमान असा उल्लेख त्यावर करण्यात आलं आहे. तर, तिसऱ्या फोटोवर जागा रिकामी सोडण्यात आली असून त्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि यावर उद्या असं या पोस्टरवर लिहिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”
“शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा म्हणाले…; उद्धव ठाकरेंनी मला…”
जितेंद्र आव्हाडांनी तोंड बंद ठेवावं, अन्यथा…; मनसेचा इशारा