Home महाराष्ट्र “तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन

“तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…”; राज्य सरकारचं आवाहन

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकार्याच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा. आम्ही ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून त्यांच्याशी समन्वय साधून हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठल्यानंतर तातडीने तुम्हाला परत आणण्याची व्यवस्था करु, अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

दरम्यान, या ट्विटबरोबर शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक गुगल फॉर्म ओपन होतो. यामध्ये माहिती देणाऱ्याचा इमेल आयडी, संपूर्ण नाव, कंट्री कोड, संपर्क क्रमांक, कोणत्या देशातील कोणत्या शहरामध्ये अडकले आहात, परदेशात जाण्याचे कारण काय, पासपोर्ट क्रमांक, व्हिजा कोणत्या प्रकारचा आहे, व्हिजाची मुदत कधी संपत आहे यासारखे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत”

मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखविण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हण

दारू विक्रीच्या परवानगीवरुन आशिष शेलार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले…

राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला- विनोद तावडे