आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही कोल्हापुरात गेले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भगव्याला मत द्या सांगत एक प्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. कोल्हापुरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला
मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते बनण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब तुम्हीच लावत आहात, असा टोमणाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी मारला.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे-भाजप युती होणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
पवार साहेब ही काळाची गरज, ते जर आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच असतं- यशोमती ठाकूर
2024 मध्ये कोल्हापूर उत्तर शिवसेनेकडे असेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे