आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर’ विभानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या दरम्यान आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीवरून मागील काही काळापासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सूरू आहे. तसेच या मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र पक्षाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून क्षीरसागर कमालीचे नाराज होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना क्षीरसागर यांना आश्वासन दिलं.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजप, शिवसेनेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”
2024 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडेच येईल, असं आश्वासन आज उद्धव ठाकरेंनी आज क्षीरसागर यांना अप्रत्यक्षरीत्या दिलं. अरे ठिक आहे, गेल्यावेळी काँग्रेस जिंकली, यावेळी काँग्रेस जिंकेल. पण युती आणि आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात. त्यामुळे पुढे जे काही करायचे आहे ते करायला आपण आहोत ना. बघु कोणमध्ये येते., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार- रामदास आठवले
आता राज ठाकरे देणार ‘करारा जवाब; ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित