आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं, असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राज्यात नव्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : 2024 मध्ये कोल्हापूर उत्तर शिवसेनेकडे असेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दरम्यान, अमरावतीमधील एका कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावेळी शरद पवारही व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचा भाजप, शिवसेनेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार- रामदास आठवले