Home महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

एसटी कर्मचाऱ्यांच्या सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

“एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गेली 40-50 वर्ष त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलेलं नाही. ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले, तेव्हा ते सोडवण्यासाठी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. याच वेळेला एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला आणि त्याचे परिणाम आज इथे दिसत आहेत”, असं शरद पावार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याविषयी वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. आज इथे जे काही घडलं, त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचं कारण नाही. नेता शहाणा नसला, तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची धडक; चप्पलफेकही केली

 भोंग्यावरून राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुजात आंबेडकरांना मनसेचं जोरदार उत्तर, म्हणाले…

 “किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”