आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
“दोन दिवस बातम्या मी पाहिल्या. त्यात सन्माननीय संजय राऊत यांनी जे विचार मांडले, ते पाहाता पत्रकार परिषदेत जी भाषा वापरली, शिव्या घालण्यात आल्या, ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या मी उच्चारू इच्छित नाही”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची धडक; चप्पलफेकही केली
म्हणे शिवसेना कुणाला घाबरत नाही. पण तुम्ही कधी शिवसैनिक होतात? संपादक म्हणून आलात तुम्ही पगारधारी नोकरदार म्हणून. तोल गेला की माणसं अशी बेफाम बोलायला लागतात. तेच संजय राऊतांच्या बाबतीत झालंय. पक्ष वाढवण्यासाठी हे विचार आहेत की पक्ष संपवण्यासाठी याचा विचार त्यांचे पक्षप्रमुख करतील, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर किरीट सोमय्यांनी INS विक्रांतच्या नावाखाली 58 कोटी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
भोंग्यावरून राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुजात आंबेडकरांना मनसेचं जोरदार उत्तर, म्हणाले…
“किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती बांधलं घड्याळ”