मुंबई : जरी केंद्र सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने घाई करू नये, असा सल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. यावर जरी केंद्र सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने घाई करू नये, असा सल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.
केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार,पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम राहिल, असं आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील तसंच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला- विनोद तावडे
…जर आघाडी तुटली नसती तर भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसती- पृथ्वीराज चव्हाण
रुग्णांना तुमची गरज आहे, ओपीडी सुरु करा; सुप्रिया सुळेंचे डॉक्टरांना आवाहन
…मग आम्हाला कसला इतिहास शिकवताय?; आशिष शेलारांच शिवसेनेवर टीकास्त्र