मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र केंद्र गांधीनगर हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्यवरुन भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पलटवार केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत जर उद्योग खात्याचा विषय असेल, तर सुभाष देसाई हे लक्ष द्यायचे. इतर विषय असल्यावर त्यांचं लक्षही नसायचं. असं असताना करोनाच्या परिस्थितीत राज्य सरकार काही करू शकत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचा विषय चालवत आहेत. त्यांच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे. हे अतिशय वाईट आहे, असं तावडे म्हणाले.
दरम्यान, त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असेल, तर पुरावे द्यावे. नुसतं हवेत कशाला बोलायचं. त्यामुळे मला वाटतं देसाई यांचं हे वागणं बरं नव्हं, असंही विदोन तावडेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…जर आघाडी तुटली नसती तर भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसती- पृथ्वीराज चव्हाण
रुग्णांना तुमची गरज आहे, ओपीडी सुरु करा; सुप्रिया सुळेंचे डॉक्टरांना आवाहन
…मग आम्हाला कसला इतिहास शिकवताय?; आशिष शेलारांच शिवसेनेवर टीकास्त्र
…तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र