आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरही भाष्य केलं.
मशिदीवरील भोंग्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा लावण्याच्या आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिक व कार्यकर्त्यांना दिला. यावरून पुणे मनसेत अंतर्गत वाद निर्माण झाला असून पुणे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा : “ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत, नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास एकत्र; चर्चांना उधाण”
मशिदीवरच्या भोंग्याविरोधात राज ठाकरेंनी शिवतीर्थावरुन आदेश दिला. मात्र त्यानंतर त्याचे तीव्र प्रतिक्रिया पक्षात उमटू लागल्या आहेत. पुण्यातल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. विकासाच्या ब्लु प्रिंटवरुन थेट भोंगे हटवण्यापर्यंत भूमिका का बदलली, असे प्रश्न मनसेचे काही पदाधिकारी विचारत आहेत. वसंत मोरेंनी तर थेट त्यांच्या प्रभागात लाऊड स्पीकर न लावण्याचं सांगून अप्रत्यक्षपणे पक्षाचा आदेश झुगारुन लावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला- रोहित पवार
चंचल स्वभावाचे राज ठाकरे ऋतुप्रमाणे रंग बदलतात- गुलाबराव पाटील
“आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”