Home महत्वाच्या बातम्या “…तोपर्यंत भाजप -मनसेची युती शक्य नाही”; रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

“…तोपर्यंत भाजप -मनसेची युती शक्य नाही”; रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नितीन गडकरींनी दिलेली राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली, यानंतर मनसे आणि भाजपाची युती होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही,” असं स्पष्ट मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : चौकशीवेळी पोलीसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं; प्रवीण दरेकर यांचा दावा

आधी केवळ आम्हालाच वाटत होतं की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, पण राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे. पण ती वेगळ्या विषयावर होणार असून ही भेट राजकीय असणार नाही,” असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘…तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षा खाली मानावा लागेल’; संजय राऊतांचं मनसेला उत्तर

पाण्याच्या समस्येमुळे पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचं हंडा मोर्चा आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात

“ज्यांना भूमिका ठरविता येत नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं?; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला