Home महाराष्ट्र चौकशीवेळी पोलीसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं; प्रवीण दरेकर यांचा दावा

चौकशीवेळी पोलीसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं; प्रवीण दरेकर यांचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई बँक घोटाळ्या प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर जे जे विचारलं त्याची माहिती देताना पोलिसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. सभादसदत्वा संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. बँकेकडून  काही लाभ घेतला गेला का? याबाबतही तीन तासात विचारणा करण्यात आली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. नोटीस पाठवून जवाब घ्या, असं आम्ही पहिल्या दिवसापासून वारंवार सांगत होतो. शेवटी 41 ए अंतर्गत नोटीस पाठवणं अपेक्षित होतं, आमची भूमिका पोलिसांकडे गेली पाहिजे त्याची माहिती पोलिसांना दिली. तेच तेच प्रश्न विचारून मला भांडावून सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘…तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षा खाली मानावा लागेल’; संजय राऊतांचं मनसेला उत्तर

दरम्यान,  ज्याची नियत साफ आहे, ज्याचं दामन साफ आहे त्याला त्रास होत नाही. जे जे विचारले त्याची उत्तरे दिली. यावेळी मला बरेचशे नियमबाह्य प्रश्न विचारले गेले. इतर संस्था आणि मजूर या संदर्भातील हे प्रकरण असताना इतर संस्था आणि फेडरल बँकेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पाण्याच्या समस्येमुळे पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचं हंडा मोर्चा आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात

“ज्यांना भूमिका ठरविता येत नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं?; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण”