आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पाण्याच्या समस्येमुळे पुण्यातील धनकवडीत राष्ट्रीय समाज पक्षाने हंडा मोर्चा काढला आहे. आंदोलनावेळी रासप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाण्याच्या मागणीसाठी क्षेत्रीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा अडवत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
आंबेगाव पठार 15, 16 नंबरमध्ये कोणत्याही सुविधा तर नाहीतच मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. समस्या एवढी भयंकर आहे, की पाण्यासाठी अक्षरश: सुट्टीही काढावी लागते. म्हणजे सगळी कामे सोडून पाण्यासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चा काढला आहे, असं आंदोलकांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “ज्यांना भूमिका ठरविता येत नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं?; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला
दरम्यान, रोज कोणीना कोणीतरी येते, फीत कापते पुढे काहीच होत नाही. निवेदनांकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत पाणीपट्टी आम्ही देतो तर पाणीही भेटायला पाहिजे. निवेदने देऊन आम्ही थकलो. त्यामुळे आंबेगाव पठार 15, 16 ते क्षेत्रीय कार्यालय असा धडक हंडा मोर्चा आम्ही काढत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण”
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”
“राष्ट्रवादीची मोठी खेळी; काँग्रेस आमदाराच्या समोरच माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ”