आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परवा दिवशी गुढीपाडव्याला बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. यावरून आता शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जो पक्ष अनेक वर्षात आपली नेमकी भूमिकाही ठरवू शकत नाही. त्या पक्षाकडे किती लक्ष द्यायचे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. सकाळ माध्यम समुहा’च्या वतीने ‘लिडींग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कार वितरण कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
हे ही वाचा : “केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण”
काही पक्षांना मी टाइमपास पक्ष समजत होतो. आता तरी त्यांना थोडे काम मिळाले आहे, अशी अप्रत्यक्ष टीका आदित्य ठाकरेंनी मनसेवर केली. तसेच ‘एमआयएम’ ही भाजपची ‘बी’ टीम, तर मनसे ही ‘सी’ टीम आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”
“राष्ट्रवादीची मोठी खेळी; काँग्रेस आमदाराच्या समोरच माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ”