Home महाराष्ट्र “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवरील सभेतून मनसैनिकांशी संवाद साधला.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिंनींनो आणि मातांनो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खरतर साडे सहा वाजल्यापासून तयार होतो. मला सगळे जण सांगत होते की ट्राफिक जाम झाल्यानं अनेक जण अडकले आहेत त्यामुळं येऊ नका. त्यामुळं मला यायला उशीर झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मनसे सैनिकांचं दर्शन घेता येतेय., असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीची मोठी खेळी; काँग्रेस आमदाराच्या समोरच माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ”

यावेळी बोलताना राज यांनी भाजप महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी भाजप एक नंबरचा पक्ष, शिवसेना दोन नंबरचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरचा पक्ष होता. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता. तुमचं अडीच अडीच वर्ष ठरलं होतं. तुमचं आतलं झंगाट होतं. तुम्हांला मतदान भाजप आणि शिवसेना म्हणून केलं होतं. शरद पवारांसोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. आम्ही सगळं विसरुन जातो. तास तास दोन तास उभे होतो. भाषण ऐकली, मतदान केलं, निर्णय आला त्यावेळी महाराष्ट्राचा निर्णय वेगळा दिसला. याच्यासाठी मतदान करता, गुलाम आहात यांचे कोणीही यावं आणि फरपटतं न्यावं. लोकांनी विसरुन जावं हे यांना हवं आहे., असंही राज यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीत शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला

“भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘हा’ मोठा नेता पुन्हा स्वगृही परतला”