आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी “शेंडी – जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही”, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर ब्राह्मण समाज आक्रमक झाला असून ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे.
शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे.
हे ही वाचा : जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा; चंद्रकांत पाटलांचं काँग्रेस पक्षाला जाहीर आवाहन
शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे, असं ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटलंय.
दरम्यान, शेंडी-जानव्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही मग टोपी-बुरख्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य आहे का?, शेंडी जाणव्याचे हिंदुत्व मान्य नाही पण शेंडी जाणव्याचे मतदान शिवसेनेला मान्य आहे अशी दुटप्पी भूमिका कशी? हा वाक्यप्रचार वापरायचा पायंडा पाडत आहात का?, असे प्रश्न ब्राह्मण समाज समन्वय समितीने शिवसेनेला विचारले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा
किरीट सोमय्यांनी येऊनचं दाखवावं; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही आक्रमक
हे सुराज्य स्थापन करताना…; राज ठाकरेंनी मनसैनिकांसोबत घेतली शपथ