आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात संसद भवनात 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीत पाच राज्यातील निवडणूक निकाल, महाराष्ट्रातील राजकारण, ईडीच्या कारवाया आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं आहे.
हे ही वाचा : ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; रामदास आठवलेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात होतं. ही भेट पवारांच्या निवासस्थानी होईल, असंही सांगितलं जात होतं. मात्र, ही भेट संसदभवनात झाली.
दरम्यान, मोदी यांनी आज महाराष्ट्रातील खासदारांशी संवाद साधला, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक होणार आहे, त्यामुळेही रणनीतीच्या दृष्टीने राऊत-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! बीडमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
‘देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा अन्…’- चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्र फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं- प्रकाश आंबेडकर