औरंगाबाद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी नोटीस दिल्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत भाजप नेत्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र हे आंदोलन करताना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे औरंगाबादच्या भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजपचे आमदार अतुल सावे,भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा आम्ही पाडू; मुंबई महापालिकेकडून राणेंना तिसरी नोटीस
क्रांती चौकात रविवारी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे ,प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, यांच्या नेतृत्वात नोटिशीची होळी करून नोटीस जाळण्यात आली होती.
दरम्यान, लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी तसेच आमच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठावला तर आम्ही तुम्हाला पोलिस व सरकारी वकीलांमार्फत षडयंत्रात अडकवून तुमचा आवाज दाबून टाकू असं तुघलकी कारस्थान महाबिघाडी सरकार करीत आहे, ‘ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी यावेळी दिली होती.
महत्वाच्या घडामोडी –
हिंदुत्वासोबतच मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
“एक नोटीस काय आली अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?”
कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या; धनंजय मुंडेंचं आव्हान