आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. फडणवीसांना नोटीस देण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले होते. त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा जळफळाट सुरु झाला असल्याचं खडसे म्हणाले. एक नोटीस आली आणि त्यांची पिळवणूक होत आहे, असा दावा करण्यात येतोय. देवेंद्रजी म्हणतात, मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली मात्र तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, असा सवाल खडसेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या; धनंजय मुंडेंचं आव्हान
दरम्यान, मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली असल्याचा आरोप खडसेंनी यावेळी फडणवीस यांच्यावर केला. तसेच माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायको बरोबर फोन कॉलचे संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं एकनाथ खडसे म्हणाले. अंजली दमानिया यांना माझ्यामागे लावण्यात आलं. हे उद्योग कोणी केले? अशा शब्दात खडसेंनी फडणवीसांना सुनावलं.
महत्वाच्या घडामोडी –
“निलेश राणे म्हणजे शिवसेनेनं जन्माला घातलेलं पिल्लू, ते आम्हांला काय शिकवणार”
चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करत आहे; काँग्रेस नेत्याची टीका