आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अशा केसेस टाकून त्यांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला. यावरून आता शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : आंदोलनानंतर मंदिरातील ई-पासची सक्ती मागे; जोतिबा-महालक्ष्मी मंदीरात दर्शनासाठी भाविकांची झुंबड
निलेश राणे म्हणजे शिवसेनेने जन्माला घातलेलं पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?’, असा जोरदार पलटवार गुलाबराव पाटलांनी यावेळी केला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटलांनी, पोलिसांनी फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीनंतर भाजपने केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं. लोकशाहीत सर्वांनाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. फडणवीसांसोबत काही चुकीचे झाले असेल, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत असेल म्हणून ते आंदोलन करत आहे. आंदोलन करणे गैर नाही, मात्र करण्यात येत असलेल्या आंदोलनाचा नागरिकांना त्रास व्हायला नको तसेच वाहने व नागरिकांना वेठीस धरू नये, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“नितेश राणे आणि निलेश राणेंची उंची किती, ते बोलतात किती?”
चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…