Home महाराष्ट्र आंदोलनानंतर मंदिरातील ई-पासची सक्ती मागे; जोतिबा-महालक्ष्मी मंदीरात दर्शनासाठी भाविकांची झुंबड

आंदोलनानंतर मंदिरातील ई-पासची सक्ती मागे; जोतिबा-महालक्ष्मी मंदीरात दर्शनासाठी भाविकांची झुंबड

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापुरमधील दख्खनचा राजा जोतिबा हे राज्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. जोतीबा मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले करावेत, ई -पास पद्धत बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आंदोलन केलं होतं.

जोतिबा देवाचे खेटे सुरू असल्याने भाविकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गावातील गुरव समाजाने ई पास बंद करून चारही दरवाजे सुरू करावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. व्यापारी, विक्रेते, गुरव समाज, मानकरी, ग्रामस्थ, महिला यांनी गाव बंद ठेवून मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर आता ई-पासची सक्ती मागे घेण्यात आल्याने रविवारी भाविकांची दोन्ही मंदीरासमोर दर्शनासाठी झुंबड उडाली होती.

दरम्यान, कोव्हिड काळात दर्शन व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी भाविकांना ई-पास नोंदणी बंधनकारक केली होती. मात्र या विरोधात वाडी रत्नागिरी येथे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून जोतिबा मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश आलं असून ई-पासची सक्ती मागे घेण्यात आली आहे.