आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बदल्यांबाबतचा अहवाल लीक झाल्याप्रकरणात आज पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपाकडून तीव्र निषेध करण्यात येत असून राज्यभर फडणवीसांना आलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणी मला मुंबई पोलिसांकडून प्रश्नावली पाठवण्यात आली होती. परंतु, ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोठा फरक होता. तसेच यापूर्वी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता आणि कोणतीच कारवाई केली नव्हती. मी हा घोटाळा काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता, असंही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले…’सरकारला अजून नऊ दिवस…’
दरम्यान, मी गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले. तसेच कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करत आहे; काँग्रेस नेत्याची टीका
दुसरा व्हिडिओ बाॅम्ब उद्या-परवा येतोय; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा