आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपकडून गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सेलिब्रेशन करण्यात आलं. यानंतर फडणवीसांचं कौतुक करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा : उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं म्हणजे…; जयंत पाटलांची भाजपावर टीका
विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले आहेत.
शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे, असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; पालकमंत्र्यांना दिला इशारा
“जोतिबा मंदिराचा ई-पास बंद करण्यासाठी, ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवून, मंदिरासमोर आंदोलन”