Home महाराष्ट्र “राजकीय वातावरण तापलं, शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तर फडणवीस राज्यपालांच्या भेटीला,...

“राजकीय वातावरण तापलं, शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तर फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यापालांच्या भेटीस पोहोचले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : आगामी मुंबई महापालिकेत महापाैर भाजपचा, तर उपमहापाैर रिपाईचा असणार- रामदास आठवले

दरम्यान, आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडी सरकारचे काही नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी कोश्यारी यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या भेटीनंतर लगेजच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार आशिष शेलार हे राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“उत्तर प्रदेशात शिवसेना भाजपला आव्हान ठरतंय?; शिवसेना नेत्यामुळे भाजप उमेद्वाराचा पराभव”

ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे- चंद्रकांत पाटील

“…तर गोव्यात चित्र वेगळं दिसलं असतं”; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत