आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गोवा विधानभा निवडणुकीमध्ये भाजपानं 19 जागांपर्यंत मजल मारली असून काँग्रेसला 12 जागा मिळवता आल्या. काँग्रेस सत्तेच्या रेसमध्ये पिछाडीवर पडल्यामुळे गोव्यात भाजपाचीच सत्ता येणार, हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
“गोवा हे एक छोटं राज्य आहे. त्यात आमदारकीचं मतदान फार कमी आहे. एकत्रित लढण्याची ताकद खूप मोठी आहे. तसं तिथे लढलो असतो, तर चित्र वेगळं दिसलं असतं”, असं रोहीत पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरलं पाहिजे, कारण…; चंद्रकांत पाटलांचा सल्ला
दरम्यान, भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं असं असावं, की उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळेल. ती जरी मिळाली, तरी महाराष्ट्रातल्या नेत्यांना खूश होण्याचं कारण काय? आता तुम्ही महाराष्ट्राच्या हिताविषयी विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्तेत होता, तेव्हा महाराष्ट्राची ताकद तुम्ही कमी करत होता”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई होणार; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा
“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला”
उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला- योगी आदित्यनाथ