Home महाराष्ट्र आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार- देवेंद्र फडणवीस

आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार- देवेंद्र फडणवीस

मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) केंद्र सरकारने गुजरातमधील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र येथे सुरु न करता ते गुजरातला नेणं हा मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यांच्या यी टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये अहवाल सादर केला होता. 2007 ते 2014 दरम्यान केंद्र किवा राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यासंबंधीच पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही. दरम्यान त्याच काळात 2007 साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या संधीचा फायदा घेतला. 2015 पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

जो है पप्पू के यार, कैसे करे मोदीजी से प्यार?; राहूल गांधींवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

मी काही गमावलं नाहीये…; इरफान खानच्या पत्नीची भावनिक पोस्ट

…तर महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं म्हणावं लागेल

महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला