आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले असा खोटा प्रचार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. हे चार पक्षच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आगामी निवडणुकीत या चारही पक्षांना ओबीसी बांधवांनी मतदान करू नये. आम्ही भाजपसोबत कदापीही आघाडी करणार नाही. काँग्रेससोबत आघाडी करायची तयारी आहे, त्यांनी चर्चेसाठी समोर यावे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : आम्हाला तुझी खूप आठवण येईल वॉर्नी; शेन वाॅर्नच्या निधनावर सचिन तेंडूलकरची भावूक पोस्ट
मागासवर्गीय आयेागाचा अहवाल कोणतेही संशोधन न करता सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने हा अहवाल फेटाळला. यासाठी सर्वस्वी भाजपच दोषी आहे. आरक्षणाबाबत कायदा करून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याची चांगली संधी राज्य शासनाला होती, परंतु सरकारने अद्याप काहीही केले नाही. राज्यातील तीन पायाचे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. अनेक मंत्री कारागृहात असून हे लुटारूंचे सरकार आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या निमित्ताने तसेच ओबीसी आरक्षणाबाबतची सत्यस्थिती मांडण्यासाठी प्रकाश आंबेडकर गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील ‘या’ माजी सरपंचानं हाती बांधलं घड्याळ”
“फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, तर राज्यपाल, महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका”
“…अन् राज ठाकरेंनी केली हर हर महादेव ची गर्जना”