Home महाराष्ट्र सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पण आता ते आमच्यावर फुत्कारतंय; उद्धव...

सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पण आता ते आमच्यावर फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठकी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला.

आज इकडे धाड पाडत आहेत, तिकडे धाड पाडत आहेत, याला अटक करत आहेत, त्याला अटक करत आहेत. मात्र, आता हे खपवून घेतलं जाणार नाही. आपली एकजूटच आपली ताकद आहे. आम्ही कुणावर वार करत नाही, पण कुणी वार केला तर आम्ही सोडणार नाही’,  असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राज्य सरकारची अनलाॅकबाबत नवी नियमावली; सांगलीसह ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता”

दरम्यान, सरकार पाडणार, सरकार पाडणार म्हणतात. माझे 170 मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, असं थेट आव्हान देतानाच सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पिलू वळवळ करत होतं आता ते आमच्यावर फुत्कारतंय, अशी टीकाही केली.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, राहुरीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

एक महिला 15 वर्षे देशाची पंतप्रधान होती, पण तिनं…; रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी सुवर्णपदक मिळवलेल्या प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ; राज ठाकरेंनी घेतले पालकत्व!